जामनेर तालुक्यातील रुग्ण संख्येची द्विशतकाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:19 IST2020-06-28T20:18:47+5:302020-06-28T20:19:23+5:30
पहूरला दहा अहवाल निगेटीव्ह

जामनेर तालुक्यातील रुग्ण संख्येची द्विशतकाकडे वाटचाल
जामनेर: तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. रविवारी १८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून यात शहरातील चार जणांचा समावेश आहे. तालुका द्विशतकाकडे वाटचाल करीत असुन आज अखेर बाधीतांची संख्या १८० झाली. बेटावद ४, पहुर कसबे व सोनाळे ३, लोंढ्री तांडा, शेंदुर्णी, ओझर व चिंचखेडे येथे प्रत्येकी एक, शहरातील नगारखान्यात तीन व श्रीरामपेठमध्ये एक बाधीत आढळुन आला ९२ जण उपचार घेऊन घरी परतले तर ८४ जणांवर उपचार सुरु असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.
पहूरला दहा अहवाल निगेटीव्ह
पहूर ता जामनेर: पहूर कसबेतील तेरा जणाच्या घेतलेल्या स्वॅब पैकी तीन अहवाल पॉझिटीव्हा प्राप्त झाले. पहूर पेठ मधील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे.