कोविड काळात शासकीय यंत्रणेतील प्रसुतीची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:53+5:302021-09-02T04:37:53+5:30
जळगाव : जिल्हाभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड ...

कोविड काळात शासकीय यंत्रणेतील प्रसुतीची संख्या घटली
जळगाव : जिल्हाभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड यंत्रणा बंद असल्याने इतर अन्य रुग्णांना उपचारासाठी खासगीकडे धाव घ्यावी लागली. यातच २०१९च्या तुलनेत गेल्या दीड वर्षाची शासकीय यंत्रणेतील महिलांच्या प्रसुतीची संख्या बघितली असता त्यात कमालीची घट झाली आहे. कोविड काळात या रुग्णालयांमध्ये यंत्रणाच नसल्याने अनेकांना खासगीत धाव घ्यावी लागली.
दुसरीकडे बाधित व संशयित महिलांच्या प्रसुतीसाठी मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्व रुग्णालये तत्पर होती. या रुग्णालयात अशा महिलांना मोठा दिलासा मिळाला. जुलैच्या अखेरीस या रुग्णालयात नॉन कोविड यंत्रणा पूर्ववत सुरू झाल्याने गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. महिनाभराची परिस्थिती बघता या ठिकाणी २१० महिलांची सामान्य प्रसुती झाली तर १३५ महिलांचे सिझेरियन झाले.
रुग्णालय एकूण प्रसुती, महिना सरासरी
अमळगाव ५, सरासरी १
अमळनेर १७१, ३५
भडगाव १५, ३
वरणंगाव ८, २
बोदवड २,०
चाळीसगाव २५६, ५०
मेहुनबरे ४२ , ७
धरणगाव २४, ५
एरंडोल ६४, १२
पहूर ०
पाचोरा १७१, ३२
पिंपळगाव हरेश्वर ८,२
पारोळा ७२, १३
पाल ३८, ७
रावेर ३३,६
सावदा ०
फैजपूर ०
न्हावी १
यावल ४८, ९
चोपडा ३०२, ६०
जामनेर ५१,१०
मुक्ताईनगर ९, २
कोविडमुळे बंधने
जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू असल्याने या ठिकाणच्या नियमित नॉन कोविड अन्य सेवांवर परिणाम झाल्याचे चित्र होते. ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१पर्यंत काहीसा दिलासा होता. मात्र, त्यानंतर दुसरी लाट आली व या ठिकाणी पूर्णतः उपचारांना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे प्रसुतीनंतरही परिणाम झाल्याचे दिसते. ही संख्या अन्य वर्षांच्या तुलनेत कमी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.