फैजपुरातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली दहावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 13:43 IST2020-06-09T13:41:10+5:302020-06-09T13:43:38+5:30

फैजपूर शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

The number of corona victims in Faizpur has reached ten | फैजपुरातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली दहावर

फैजपुरातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली दहावर


फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकने वाढली असून, आता कोरोना बाधितांची संख्या ही दहावर जाऊन पोहोचली आहे. इस्लामपुरा इदगाह रोडवरील पाच दिवसापूर्वी मयत झालेल्या एका इसमाचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला. त्यात त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या घरातील काही सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, तो परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, सोमवारीच खुशालभाऊ रोडवरील एका व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने तो परिसर सील करण्यात आला होता. त्यामुळे आता शहरातील कंटेनमेंट झोनची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही शहरवासीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

Web Title: The number of corona victims in Faizpur has reached ten