कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्या दहावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:52+5:302021-09-21T04:19:52+5:30
जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात १ कोरोना रुग्ण आढळून आला असून ८ रुग्ण बरे झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ...

कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्या दहावर
जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात १ कोरोना रुग्ण आढळून आला असून ८ रुग्ण बरे झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच १० वर आली आहे. जिल्ह्यात केवळ चार तालुक्यात रुग्ण असून अन्य तालुक्यात रुग्ण संख्या शून्यावर आहे.
सोमवारी आरटीपीसीआरचे ३५३ अहवाल समोर आले तर अँटीजनच्या २०९ चाचण्यांमध्ये १ बाधित आढळून आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जळगाव शहरात नवीन रुग्ण आढळून न आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ वर आली आहे. यासह भुसावळ, धरणगाव प्रत्येकी २ आणि चाळीसगाव तालुक्यात १ सक्रिय रुग्ण आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस जळगाव शहरात रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली होती मात्र शनिवारपासून नवीन रुग्ण नसल्याने दिलासा मिळाला आहे.