मास्क न लावणाऱ्यावंर आता पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:22 PM2020-08-01T12:22:37+5:302020-08-01T12:22:53+5:30

५०० रुपयांचा दंड : शहरात व ग्रामीण भागात स्वतंत्र नियोजन

Now watch the teams on those who don't wear masks | मास्क न लावणाऱ्यावंर आता पथकांचा वॉच

मास्क न लावणाऱ्यावंर आता पथकांचा वॉच

Next

ळगाव : मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगचा पालन अधिक प्रभावीपणे व्हावे, यासाठी आता शहरी व ग्रामीण भागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके नेमण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाºयांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे़ ५०० रुपये दंडाचा अधिकार या पथकांना देण्यात आला आहे़ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासंदर्भात शुक्रवारी आदेश काढले आहेत़
मास्क लावणे, सोशल डिस्टन्ंिसगचे पालन, गर्दी टाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंंकणे व इतर तरतुदींचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याकरीता जिल्ह्यातील जळगाव शहर महापालिका क्षेत्रात व तालुकास्तरावर जिल्हा परिषद गटनिहाय स्वतंत्र पथकाची नेमणूक करणे आवश्यक असल्यानुसार ही पथके नियुक्त करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे़
या पथकात शहरात वॉर्ड, प्रभाग निहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी व एक पोलीस कर्मचारीही पथकात असतील तसेच जि़ प़ गटनिहाय व नगरपालिका क्षेत्रात वार्ड, प्रभाग निहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा समावेश असेल या पथकांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करोव, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय दंडाधिकारी व आयुक्तांना दिले आहे़ करण्यात आले आहेत़

मास्क, सुरक्षित अंतर व साबणाने हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करा
जिल्ह्यात कोरोनाची संख्या ११ हजार १०३ तर मृत्यूचा आकडा ५१८ इतका पोहचला आहे. देशभरातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या शहरात जळगाव जिल्ह्याचे नाव आता समाविष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने हा विषय अजून गांभीर्याने घेतला आहे. रुग्ण संख्या वाढू नये यासाठी नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. रुग्ण संख्या वाढल्याने कोविड सेंटरमध्ये रुग्णांना जागा शिल्लक नाही, प्रत्येक रुग्णावर उपचार करणे, त्यांना दाखल करुन घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. दुसरीकडे गेल्या चार महिन्यापासून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर रात्रंदिवस रुग्णसेवेत असल्याने त्यांचीही मानसिकता खालावल चालली आहे. आरोग्य व खाकीतील योध्दे बाधित झाले आहेत, तरीही अविरत सेवेचे काम या यंत्रणांकडून सुरुच आहे. आजूबाजुला घडणारी घटना आपल्याकडे घडू नये यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व वारंवार साबणाने हात स्वच्छ करणे या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकिय यंत्रणेने केले आहे.

दंड टाळण्यासाठी काय बंधनकारक
-सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, वाहतूक,प्रवास करताना मास्कचा लावणे
- कोणत्याही दुकानात, आस्थापनेत एक वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत़
- विना मास्क दुकानात आल्यास, दुकानमालक अशा ग्राहकांना वस्तू देणार नाहीत
- सर्व दुकान मालक, आस्थापना दुकान मालक, कर्मचारी व ग्राहक यांना मास्कचा वापर बंधनकारक
- लग्नासंभारंभासाठी ५० व अत्यंविधिसाठी २० पेक्षा अधिक व्यक्ति आढळून आल्यास प्रति व्यक्ति २०० रुपये दंड व कायद्यानुसार गुन्हा दाखल करावे़

वाहनांसाठी काय ?
दुचाकीवर दोन व्यक्तिंना मास्क लावणे बंधनकारक, तीन चाकीसाठी एक चालक व अत्यावश्यक सेवेसाठी दोन प्रवासी, चार चाकीमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी चालक अधिक ३ प्रवासी असतील, या नियमांचा भंग केल्यास वाहनांना ५०० रुपये दंड व वाहनाचा अहवाल तयार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे द्यावा, त्यानुसार परवाना निलंबित किंवा दंडाची आकारणी करण्याबाबत कारवाई करण्यात येईल.रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी या निर्णयाची कडक अमलबजावणी केली जाणार आहे.

Web Title: Now watch the teams on those who don't wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.