हद्दीच्या वादानंतर आता साहेबाचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:36+5:302021-09-09T04:22:36+5:30
जळगाव : कोणत्याही तक्रारदाराने कुठेही तक्रार दिली तर ती ठाणे अंमलदाराने दाखल करून घेणे अपेक्षित आहे, मात्र साहेब नसल्याचे ...

हद्दीच्या वादानंतर आता साहेबाचे कारण
जळगाव : कोणत्याही तक्रारदाराने कुठेही तक्रार दिली तर ती ठाणे अंमलदाराने दाखल करून घेणे अपेक्षित आहे, मात्र साहेब नसल्याचे कारण सांगून तत्काळ गुन्हा दाखल करून घेण्याचे प्रमाण पोलीस ठाण्यांमध्ये वाढले आहे. यापूर्वी हद्दीचा वाद घालून तक्रार दाखल करणे टाळले जात होते, वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतल्याने जिल्ह्यात या प्रकारांना आळा बसला आहे.
सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या त्या भागात एक पोलीस ठाणे दिलेले आहे. मात्र तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कोणाच्या हद्दीत घडला याची विचारणा होते? तो दुसऱ्या ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यास तक्रारदाराला तिकडे पाठविले जाते. प्रत्यक्षात सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची हद्द असल्यास नंतर तो त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात मात्र यापूर्वी तसे घडत नव्हते, आता मात्र हे प्रकार थांबले आहेत तर साहेब (प्रभारी अधिकारी) नसल्याचे कारण पुढे करून तक्रार घेणे टाळले जात असल्याचे प्रकार वाढत चालले आहे. रोज प्रत्येक पोलीस ठाण्यात कमी अधिक प्रमाणात असे प्रसंग अनुभवायला येत आहेत.
जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे - ३५
पोलीस अधिकारी - १९६
पोलीस कर्मचारी - ३१९८