शासन नव्हे आता संत-महंतच बनवतील राम मंदिर
By Admin | Updated: October 6, 2015 00:52 IST2015-10-06T00:52:42+5:302015-10-06T00:52:42+5:30
शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती : केवळ राज्यात नव्हे तर देशभरात गो हत्या बंदी करणे आवश्यक

शासन नव्हे आता संत-महंतच बनवतील राम मंदिर
जळगाव : अनेक वर्षापासून अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याचे प्रय} सुरू आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे काम मुळीच करू शकत नाही. राम मंदिर हे केवळ संत, महंत उभारु शकतात. आर्यन शैलीत राम मंदिर उभे करण्याचे आमचे स्वप्न असून लवकरच सत्यात उतरविणार, असा विश्वास द्वारका व ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला. उद्योजक संजय दादलिका यांच्या निवासस्थानी सोमवारी दुपारी ही पत्रपरिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. मशिदीचा उल्लेख नाही.. अयोध्या येथील राम मंदिरात मशिद होती, याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यामुळे या जागेवर केवळ राम मंदिर व्हावे, यासाठी आम्ही काम करत असून त्यासाठी आम्हाला राजकीय पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही. संत, महंत हे काम करू शकतात, असे ही शंकराचार्य म्हणाले. कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली राज्यातील नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळाबाबत शंकाराचार्य म्हणाले, कुंभमेळासाठी देशभरातून साधू, महंतासोबत परदेशातूनही अनेक जण आले होते. त्यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे. कुंभमेळाचे नियोजन चांगले होते. या मेळ्यात एकत्र आलेल्या सनातन धर्मियांनी एकतेचा संदेश दिला. पवित्र गोदामाईला शुद्ध करण्याची गरज काय? कुंभमेळाव्याच्या पर्वणी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवरातील तीर्थ आणून टाकले. मूळात गोदावरी नदी ही पवित्र व शुद्ध आहे. हे तीर्थ आणून शुद्ध करण्याची काहीही गरजच नव्हती असे म्हणत, शंकराचार्य यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. गोदेचा प्रवाह मुक्त करावा गोदावरी स्वच्छतेसाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचे स्वागत आहे. मात्र, गोदावरी नदीचे पाणी हे आडवण्यात आल्यामुळे प्रदूषण वाढले आहे. हा प्रवाह मुक्त केला तर प्रदूषणच झाले नसते. सनातनवर बंदी हवी की नको? या प्रश्नावर शंकाराचार्य म्हणाले, की सरकार हे धर्मनिरपेक्ष राहील. मात्र, व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. सनातन संस्था काय आहे? हे माहीत नाही. मात्र, आम्ही सनातन आहोत.