..आता ललित कोल्हेंची 'नवनिर्माण विकास आघाडी'
By Admin | Updated: November 5, 2014 15:00 IST2014-11-05T15:00:49+5:302014-11-05T15:00:49+5:30
मनसेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे व नगरसेवकांनी 'नवनिर्माण विकास आघाडी' स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

..आता ललित कोल्हेंची 'नवनिर्माण विकास आघाडी'
>जळगाव : मनसेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे व नगरसेवकांनी 'नवनिर्माण विकास आघाडी' स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून बुधवारी याबाबत ते भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोल्हे यांनी नवनिर्माण विकास आघाडी स्थापनही केली आहे. मात्र मनसेतून बाहेर पडताना नगरसेवकपद कायम रहावे, यासाठी काय करता येईल? यादृष्टीने कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे समजते. मंगळवारीदेखील याबाबत बैठक झाल्याचे समजते. यासंदर्भात बुधवारी ते भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते.
भाजपासोबत जाण्याची शक्यता
हे सर्व नगरसेवक मनसेतून बाहेर पडून आघाडी स्थापन करतील. ती आघाडी भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.
पक्षांतर बंदी कायद्याची भिती असल्याने विधीज्ञांचा सल्ला घेऊनच प्रत्येक पाऊल उचलले जात असल्याचे समजते. आपल्यासह मनसेच्या नगरसेवकांनी एकनाथराव खडसेंची भेट घेतली. काय चर्चा झाली?
कोल्हे- ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पण मी मनसेच्या सर्व नगरसेवकांसोबत खडसे यांचा सत्कार केला. ते मंत्री झाल्यानंतर प्रथमच शहरात आले. यामुळे सदीच्छा म्हणून त्यांची भेट घेतली.
भाजपात जाण्याचा किंवा त्यांना पाठिंबा देण्याचा विचार आहे का?
कोल्हे- भाजपात जाणार नाही. तशी कोणतीही चर्चा खडसे यांच्याशी झालेली नाही. परंतु लवकरच भूमिका स्पष्ट केली जाईल.
आपल्यासह मनसेच्या नगरसेवकांनी एकनाथराव खडसेंची भेट घेतली. काय चर्चा झाली?