शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता 'निकाला'लाही सुरूवात ; 'एम. फार्मसी, जीएसटी'चा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:23 IST

९५ टक्के दिली नवव्या दिवशी परीक्षा : ऑफलाईन परीक्षांचे निकाल लवकरच

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष,अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या नवव्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत ९५ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत या परीक्षा सुरु होत्या. दरम्यान, आता ऑनलाईन परीक्षांचे निकाल जाहीर होण्‍यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी एम. फार्मसी आणि जीएसटी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत. लवकरच ऑफलाईन परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहे.विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. मंगळवारी परीक्षेचा नववा दिवस होता. मंगळवारी विविध विद्याशाखांच्या १९६ विषयांच्या परीक्षा होत्या. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या परीक्षांच्या विविध सत्रात ८ हजार ५३० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली तर या सत्रात २३०० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली.सीईटीमुळे काही परीक्षा पुढे ढकलल्याबी.एड., एम.पी.एड. व एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या सी.ई.टी. परीक्षांमुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या २१ तसेच २२, २३ तसेच २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून सुधारीत तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.अशा आहेत सुधारित तारखामहाराष्ट्र शासनाने बी.एड., एम.पी.एड. व एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या सी.ई.टी. परीक्षांचे तसेच त्यानंतर या अभ्यासक्रमांच्या फिल्ड टेस्ट चे आयोजन जाहीर केले असल्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (नियमित व बॅकलॉगसह) विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यार्थी हित लक्षात घेवून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा या आता १ नोव्हेंबर रोजी तर २२ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी, २३ ऑक्टोबरची परीक्षा १० नोव्हेंबर रोजी, २८ ऑक्टोबरची परीक्षा ११ नोव्हेंबर रोजी आणि २९ ऑक्टोबरची परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी त्याच वेळेस ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत. ऑफलाईन परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर होतील अशी माहिती संचालक बी.पी. पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव