वाचकाला शेवटर्पयत खिळवून ठेवणारी कादंबरी ‘दप्तर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 16:11 IST2017-11-15T16:09:42+5:302017-11-15T16:11:03+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये बुक शेल्फ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी साहित्यिक अशोक कौतीक कोळी

वाचकाला शेवटर्पयत खिळवून ठेवणारी कादंबरी ‘दप्तर’
अशोक कौतीक कोळी, खान्देशातील महत्त्वाचे लेखक. ‘दप्तर’ ही त्यांची कादंबरी साकेत प्रकाशनच्या वतीने प्रकाशित झाली. ‘दप्तर’ हा तुमच्या आमच्या सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या सर्वाच्या मनात दप्तराविषयीचा एक हळवा कोपरा असतो. कोपरा दप्तराविषयीच्या आणि शाळाविषयीच्या अर्थातच बालपणाविषयीच्या आठवणींनी व्यापलेला असतो. दप्तर कादंबरी याच विषयावर बेतलेली असल्याने ‘दप्तर’ हे शीर्षक आहे. अर्थातच बालपणीच्या आठवणींचा खजिना. सोबतच आहे शिक्षणाविषयी प्रचंड ओढ असलेल्या नायकाची संघष कथा. ही कथा स्थलांतरित पालकांच्या शाळाबाह्य पाल्याच्या शैक्षणिक अनास्थेवर प्रकाश टाकते. त्यांच्या लेखनाचा पिंड वास्तववादी आहे. असे असले तरी इतर कादंब:याप्रमाणे ‘दप्तर’मधील कथा प्रखर वास्तवाच्या टोकावर वावरत असली तरी केवळ प्रखर वास्तवाच्या चित्रणावर भर नसून, ही कथा जास्तीत जास्त रंजक, कल्पक व परिणामकारक करण्यावर भर आहे. जेणेकरून कादंबरी वाचायला सुरुवात केल्यानंतर वाचक शेवटर्पयत खिळून राहील. ही कादंबरी एका ज्वलंत प्रश्नाला हात घालते. सोबतच वेगळा वा्मयीन प्रयोगही साकारते. खान्देशच्या पाश्र्वभूमीवर घडणारे हे कथानक खान्देशची लोकधारा, लोकसंकेत, लोकवा्मय यांचा यथोचित सन्मान करत खान्देशी बोलीला वा्मयीन प्रतिष्ठा प्राप्त करून देते.
लेखक : अशोक कौतीक कोळी, प्रकाशक : साकेत प्रकाशन, पृष्ठे 144, मूल्य 150 रुपये