निवडणूक खर्चासंदर्भात दोन जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:52 PM2019-04-23T12:52:55+5:302019-04-23T12:53:28+5:30

खुलासा सादर न करणे

Notice to two people regarding election expenditure | निवडणूक खर्चासंदर्भात दोन जणांना नोटीस

निवडणूक खर्चासंदर्भात दोन जणांना नोटीस

Next

जळगाव : निवडणूक खर्च सादर न करणे, हिशेबात तफावत, खुलासा सादर न करणे अशा विविध कारणांनी राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे (सेक्यूलर) उमेदवार शरद गोरख भामरे (सुतार) व अपक्ष उमेदवार ओंकार चैनसिंग जाधव यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नोटीस बजावल्या आहेत. संबधितांना आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले असून खुलासा सादर न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तसेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेही आपला निवडणूक खर्च सादर करणे व हिशोब तपासणी हजर राहणे बंधनकारक असताना जळगाव मतदार संघात पुन्हा दोन जण निवडणूक खर्च नोंद वही तपासणीस गैरहजर राहिल्याने या नोटीस बजावल्या आहेत.
शरद भामरे यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, निवडणूक खर्च निरीक्षकांकडे दुसºया व तिसºया तपासणीसाठी कळवूनही उमेदवारांचे प्रतिनिधी व उमेदवार हजर राहिले नाही. त्या संदर्भात नोटीस देऊनही खुलासा सादर केला नसल्याने त्यांना नोटीस बजावली आहे. त्याचा दोन दिवसात खुलासा सादर करावा, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईळ, असा इशाराही दिला आहे.
या सोबतच ओंकार जाधव यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, निवडणूक खर्च निरीक्षकांकडे तिसºया तपासणीसाठी कळवूनही उमेदवारांचे प्रतिनिधी व उमेदवार हजर राहिले नाही. दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास कारवाईस पात्र रहाल, असा इशाराही यात दिला आहे.

Web Title: Notice to two people regarding election expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव