भाजपच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:44+5:302021-09-03T04:17:44+5:30

सावदा, ता. रावेर : भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि नऊ नगरसेवकांना म्हणजेच दोन नगरसेविका वगळता बाकी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ...

Notice to nine corporators including BJP mayor | भाजपच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना नोटीस

भाजपच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना नोटीस

सावदा, ता. रावेर : भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि नऊ नगरसेवकांना म्हणजेच दोन नगरसेविका वगळता बाकी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर हजेरी लावल्याने तालुका भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावदा शहर आढावा बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. २०१६ ला झालेल्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत अनिता पंकज येवले व दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यातील एक नगरसेविका वगळता बाकी सर्व राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले होते. याची भारतीय जनता पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या निर्देशानुसार अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांना ही नोटीस बजावण्यात आली आहे, तर सात दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आल्याने नगराध्यक्षांसह नगरसेवक काय कारणे दाखवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Notice to nine corporators including BJP mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.