शहामृग पालनप्रकरणी बाग माळीला नोटीस
By Admin | Updated: November 19, 2014 13:52 IST2014-11-19T13:42:14+5:302014-11-19T13:52:36+5:30
महापालिकेच्या देवपूरमधील उद्यानात अनधिकृतपणे शहामृग पालन केले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.

शहामृग पालनप्रकरणी बाग माळीला नोटीस
धुळे : महापालिकेच्या देवपूरमधील उद्यानात अनधिकृतपणे शहामृग पालन केले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. यात काँग्रेसच्या नगरसेवकाला अभय देत प्रशासनाने मात्र बाग माळी दिनेश माळी यांना नोटीस बजावत कारवाईचा देखावा केला आहे.
शहरातील देवपूर भागात संत गाडगेबाबा उद्यान उभारण्यात आले आहे. परंतु या उद्यानाचा अद्यापही लोकार्पण सोहळा झालेला नाही. त्यात लॉनचे काम करण्यात आले. परंतु या भागातील काँग्रेसचे नगरसेवक सदाशिव पाटील यांनी अनधिकृतपणे तीन शहामृगांना या उद्यानात आसरा दिला. नंतर त्यांनी इमू पालन व्यवसाय हाती घेतल्याचे समोर आले. त्यासाठी हे उद्यानच विनाभांडवली वापरले. त्यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला. तथापि सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांनी 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्याचा प्रकार करून बाग माळय़ाला नोटीस दिली.