अमळनेर मतदारसंघात प्रिंटिंग प्रेस मालकांसह पाच उमेदवारांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 21:22 IST2019-10-14T21:22:05+5:302019-10-14T21:22:10+5:30
अमळनेर : उमेदवारांनी छापलेल्या पत्रिकांची माहिती निवडणूक निर्णय अधिका-यांना कळवली नाही. याप्रकरणी संबंधित प्रिंटिंग प्रेस मालकांना व खर्च सादर ...

अमळनेर मतदारसंघात प्रिंटिंग प्रेस मालकांसह पाच उमेदवारांना नोटीस
अमळनेर : उमेदवारांनी छापलेल्या पत्रिकांची माहिती निवडणूक निर्णय अधिका-यांना कळवली नाही. याप्रकरणी संबंधित प्रिंटिंग प्रेस मालकांना व खर्च सादर न केलेल्या ५ उमेदवारांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
निवडणुकीत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी छपाई केलेल्या कामकाजाचा अहवाल, प्रतींची संख्या व प्रकाशकाचे नाव वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवणे गरजेचे असताना प्रिंटिंग प्रेस मालकांनी अहवाल सादर केला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी सत्यनारायण प्रिंटिंग प्रेस, ईगल इंटरप्रयझेस, साधना प्रिंटिंग प्रेस, जागृती आॅफसेट, एस.के.प्रिंटिंग प्रेस, महाजन आॅफसेट, वर्धमान आॅफसेट, मंगलमूर्ती आॅफसेट, रेणुका आॅफसेट, पाटील आॅफसेट, गायत्री प्रिंटिंग प्रेस, प्रोग्रेसिव्ह मीडियाज यांना नोटिसा दिल्या. याबाबत दोन दिवसात खुलासा सादर करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
मनसेचे उमेदवार अंकलेश मच्छींद्र पाटील, बसपा उमेदवार रामकृष्ण विजय बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे श्रावण धर्मा वंजारी तसेच अनिल(दाजी) भाईदास पाटील रा. धाबे, अनिल भाईदास पाटील रणाईचे यांनी विहित नमुन्यात खर्च सादर करण्यात कसूर केली. त्यांनी त्वरित खर्च सादर करावा अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.