‘नो व्हेइकल डे’ साजरा

By Admin | Updated: September 23, 2015 00:02 IST2015-09-23T00:02:24+5:302015-09-23T00:02:24+5:30

जळगाव : शहरातील विविध शाळांमध्ये नो व्हेइकल डे मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

'No Vehicle Day' celebrated | ‘नो व्हेइकल डे’ साजरा

‘नो व्हेइकल डे’ साजरा

जळगाव : शहरातील विविध शाळांमध्ये नो व्हेइकल डे मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात विद्याथ्र्यानी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

भगीरथ स्कूल

भगीरथ इंग्लिश स्कूलच्या विद्याथ्र्यानी परिसरातील रस्त्यावर थांबून ये-जा करणा:या वाहनचालकांना वाहने वापरू नका, असे आवाहन केले. यावेळी जनजागृतीपर 500 पत्रके वितरित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय हरीत सेना प्रमुख संजय बाविस्कर, मुख्याध्यापिका आशा चौधरी, पर्यवेक्षक किशोर राजे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैभव पाटील, गौरव पाटील, निरज बावीस्कर, ग्रीष्मा तेली, आचल पाटील, धनश्री गोराणे यांनी परिश्रम घेतले.

भाऊसाहेब राऊत विद्यालय

विज्ञान शिक्षिका वैशाली नारखेडे यांनी विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले. यावेळी पांडे डेअरी चौक, नेरी नाका चौक, बेंडाळे चौकात जनजागृतीपर पत्रके वाटप केली. यावेळी पर्यवेक्षक पी. आर. कोळी, एस. एस. अत्तरदे, एल. एस. तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले.

यशस्वीतेसाठी एस. आर. शिरसाळे व शिक्षकेत्तर कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.

यासह शहरातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

Web Title: 'No Vehicle Day' celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.