शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक रुपयाचीही तरतूद नाही - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 12:18 IST

सरकारच्या कृपेने रोज माणसे मरत असल्याचा आरोप

ठळक मुद्देआरोग्याच्या धोरणाबाबत सरकारची ‘चिरफाड’माणसे मरतात आणि सरकार तोंडाला पाने पुसते

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असून येथे सरकारच्या कृपेने दररोज माणसे मरत आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय विभागाकडे असो की आरोग्य विभागाकडे, सुविधा कधी देणार ते सांगा असा खडा सवाल करीत जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक रुपयांचीही तरतूद नसल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी करीत केवळ गवगवा केला जात असल्याचाही आरोप केला.जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून या बाबत आपण वारंवार आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत खडसे यांनी विधीमंडळात व्यक्त करीत आरोग्यमंत्र्यांवर चांगलीच आगपाखड केली.सुविधांबाबत सभागृहातच उत्तर द्याजिल्हा रुग्णालयात एआरआयची सुविधा नाही, सिटीस्कॅन, एक्स-रेसाठी तंत्रज्ञ नाही, त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. रुग्णांच्या उपचारासाठी सांगितले तर जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे, असे सांगितले जाते, ते कोणाकडेही असो, तेथे सुविधा द्या, अशी मागणी खडसे यांनी करीत केवळ वैद्यकीय महाविद्यालयाबाबत गवगवा आहे, मात्र त्यासाठी एक रुपयाचीही तरतूद नसल्याचा मुद्दाही त्यांनी विधीमंडळात मांडला. वैद्यकीय महविद्यालय होत असल्याचे स्वागत आहे, मात्र सुविधा कधी देतात, याचे उत्तर आपल्याला पाहिजे, असे त्यांनी ठासून सांगत यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे, अशी मागणी केली.माणसे मरतात आणि सरकार तोंडाला पाने पुसतेपाच दिवसात मुक्ताईनगर मतदार संघातील दोन रुग्णांबाबत वाईट अनुभव आल्याचे सांगत यात केवळ सुविधांअभावी एका महिलेला जीव गमवावा लागला, याला जबाबदार कोण, असा सवाल करीत आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. केवळ लाखोचे आरोग्य शिबिर घेऊन ‘या मुंबईला...’ असे सांगितले जाते व येथे आल्यावर उपचाराची बोंब असल्याचे सांगून सरकार आमच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप करीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाना साधला.उपोषणाच्या इशा-यानंतर वैद्यकीय अधिकारी दिले, मात्र ते हजरच नाहीजळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांबाबत आपण उपोषणाचा इशारा दिला होता, त्यानंतर ४० वैद्यकीय अधिकारी दिल्याचे सांगण्यात आले. त्यातील काही पाच दिवस आले व नंतर गायब झाले, त्याचा काय उपयोग, असे सांगत वैद्यकीय अधिकारी कधी देतात, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.काय भोगावे लागते ते आम्हाला माहितजळगाव जिल्ह्यात दररोज अपघात होऊन मृत व्यक्तींचे वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन करण्यास अडचणी येत असल्याचे सांगून जिल्ह्यातील आरोग्यविषयक वास्तव सभागृहात मांडले. सोबतच लोक मृतदेह घेऊन आमदारांच्या दारी येतात. त्यांच्या हाती त्या वेळी दगडं असतात, अशा वेळी आम्हाला काय भोगावे लागते, हे आम्हालाच माहित, असे गंभीर चित्रही मांडले. आरोग्यमंत्री जळगावला येऊन गेले, त्याबद्दल त्यांचा आभारी, असे उपरोधकपणे म्हणत आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल आमची केवळ थट्टाच चालली असल्याचा आरोपही खडसे यांनी केला.

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्य