पवन ऊर्जा प्रकल्पासाठी ‘ना हरकत’
By Admin | Updated: October 11, 2015 00:30 IST2015-10-11T00:30:20+5:302015-10-11T00:30:20+5:30
पवन उर्जा प्रकल्पाला टिटाणे येथील जागेची पाहणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभागाने या प्रकल्पासाठी ना हरकत देण्याचे मान्य केले आह़े

पवन ऊर्जा प्रकल्पासाठी ‘ना हरकत’
धुळे : महापालिकेतर्फे 2008 पासून प्रस्तावित असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव सध्या कासवगतीने पुढे सरकत आह़े जिल्हाधिका:यांनी या प्रस्तावात काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू आह़े दरम्यान टिटाणे येथील जागेची पाहणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभागाने या प्रकल्पासाठी ना हरकत देण्याचे मान्य केले आह़े ‘ना हरकत’ मिळाल्यानंतर जिल्हा परिषद व भूमी अभिलेख या विभागांचे ‘ना हरकत’ घेऊन प्रस्ताव सादर केला जाणार आह़े टिटाणे येथील जागेच्या पाहणीला मनपाचे प्ऱनगररचनाकार एस़बी़ विसपुते व अधिकारिवर्ग उपस्थित होता़ मनपाच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी दहा वर्षापासून चालढकल सुरू आह़े या प्रकल्पाला दोन वर्षापूर्वी काढण्यात आलेल्या किमतीनुसार 16 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 70 टक्के रक्कम राज्यशासन आणि केंद्रशासनाच्या अपारंपरिक ऊर्जा स्नेत विकास मंडळाकडून मिळविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नागपूर येथील एक्सीनो कॅपिटल सव्र्हिसेस कंपनीची नेमणूक करण्यात आली होती़ प्रकल्पाच्या ठिकाणी दोन मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे दोन संच उभारणे प्रस्तावित असून प्रत्येक संचातून एका वर्षात 3.50 मिलियन युनिट वीजनिर्मिती होणार आहे. दोन्ही संचातून सात मिलियन युनिट वीजनिर्मिती होईल. ही वीज महापालिकेला पाणीपुरवठय़ासह पथदिवे व कार्यालयांसाठी वापरात येणार आहे. पाटबंधारे व बांधकाम विभागाचे