एकही ग्रामसेवक नाही कारवाईविना
By Admin | Updated: October 5, 2015 00:46 IST2015-10-05T00:46:25+5:302015-10-05T00:46:25+5:30
जळगाव : तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमुळे कारवाई झाली असा एकही ग्रामसेवक नाही, त्यामुळे पुरस्कारासाठी निवड करताना दमछाक झाली, अशी कबुला पाण्डेय यांनी दिली.

एकही ग्रामसेवक नाही कारवाईविना
जळगाव : तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमुळे एकही ग्रामसेवक चौकशी सुरू नाही अथवा, निलंबन झालेले नाही, असा नाही. त्यामुळे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करताना चांगलीच दमछाक झाली, अशी कबुली जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. ग्रामसेवकाने विनाचौकशी व विनानिलंबन काम करणे हे जगातील सर्वात कठीण काम झाले आहे. आता तर 14वा वित्त आयोग येत असल्याने अधिक खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे सांगितले. जि.प.तर्फे जिल्हा बँक सभागृहात रविवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री एकनाथराव खडसे तर उद्घाटक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते. ग्रामसेवकांना शाल, श्रीफळ, सोन्याचे नाणे तसेच त्यांच्या प}ीला साडी देऊन गौरविण्यात आले. पाण्डेय म्हणाले की, सर्व राजकीय नेत्यांची इथे उपस्थिती आहे. हे तुमची (ग्रामसेवकांची) काय पॉवर आहे, ते दर्शविते. पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. आता आदर्श ग्रामसेवक पुरस्कार स्वीकारताना सर्वानीच कुटुंबियांना सोबत आणले आहे. त्यांच्या चेह:यावर आज जो आनंद आहे, तो कायम लक्षात ठेवा. जर चुकीचे वागाल व कारवाई झाली, तर यांना काय वाटेल? याचे भान ठेवा, असे बजावले. नियमांचे पालन करा आता चौदावा वित्त आयोग येत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांबाबत तक्रारी येतीलच. त्यात जर तथ्य निघाले तर कारवाई होईल. त्यामुळे नियमांचे पालन करा, असे बजावले. व्यासपीठावर जि.प. अध्यक्षा प्रयाग कोळी, खासदार ए.टी. पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, समाजकल्याण सभापती दर्शना घोडेस्वार, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) मीनल कुटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी आदी उपस्थित होते. मनरेगाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा शक्य शासनाच्या ग्रामविकासाच्या विविध योजना ग्रा.पं. मार्फत राबविण्याचे महत्वाचे केंद्र ग्रामसेवक आहे. ग्रामविकासासाठी नियोजनाचे अधिकार ग्रा.पं.ना देणे, निधी थेट ग्रा.पं.ला पाठविणे, मनगरेगाच्या माध्यमातून बांधकाम, पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने सवलत पुढील आठवडय़ापासून देत आहोत. ग्रामविकासाच्या उद्देशाने ही वाटचाल असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. बिले तत्काळ निकाली काढा सर्वच ग्रामसेवक भ्रष्ट नाहीत.त्यांची 2-3 वर्षापासून वैद्यकीय बिले प्रलंबित ठेवली जातात. ती तातडीने दिली गेली पाहिजेत. रजेबाबतच्या मागणीवर निर्णय व्हावा, त्यांच्या प्रवासभत्त्यात वाढ करण्याचे विचाराधीन असल्याचे सांगितले. आमचा बँडही वाजवू शकता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले ग्रामसेवक, तलाठी आणि शिक्षक असे घटक आहेत की ठरविले तर काहीही करू शकतात. आमचा बँडही वाजवू शकतात. त्यामुळे आम्ही आवजरून येतो, असे सांगताच हशा पसरला. ग्रामसेवकाने ठरविले तर गावाचा कायापालट होऊ शकतो. हगणदरी मुक्ती होऊ शकली नाही महाजन म्हणाले की, 25 वर्ष आमदार आहे. आता मंत्री म्हणून काम करतोय. मात्र अजूनही गावे हगणदरीमुक्त करू शकलेलो नाही. याची लाज वाटते. जी गाव आदर्श ठरली. तेथेही हगणदरी आहे. सूत्रसंचालन अजबसिंग पाटील यांनी केले. आदर्श ग्रामसेवक पुरस्कारार्थी.. 2010-11 पासून गत चार वर्षातील पुरस्कार देण्यात आले. त्यात दरवर्षी एका तालुक्यात एक ग्रामसेवक याप्रमाणे 60 ग्रामसेवकांना पुरस्कार देण्यात आले. त्यांची नावे पुढील प्रमाणे जळगाव- प्रवीण आधार अहिरे, रवींद्र शालिग्राम सपकाळे, मनीष रामदास पाटील, गजानन शंकर चव्हाण, जामनेर- अजय भगवान वंजारी, विजय समाधान पाटील, योगेश भास्कर पालव, दीपक सुरेश पाटील. पालकमंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, 4 वर्ष ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण झालेच नाही. हे अयोग्य आहे. दरवर्षी हे पुरस्कार दिले पाहिजे. त्यामुळे प्रोत्साहन मिळते.