ना कोरोनाचे भय, ना मरणाचे भय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:34+5:302021-09-03T04:16:34+5:30

ऊन, वारा, थंडी, पाऊस यांचा त्रास सहन करीत कोरोना काळातही जीव धोक्यात घालून ती या ठिकाणी बसून आहे. बहाळ ...

No fear of corona, no fear of death ... | ना कोरोनाचे भय, ना मरणाचे भय...

ना कोरोनाचे भय, ना मरणाचे भय...

ऊन, वारा, थंडी, पाऊस यांचा त्रास सहन करीत कोरोना काळातही जीव धोक्यात घालून ती या ठिकाणी बसून आहे. बहाळ येथील ओंकार नथ्थू महाजन यांच्या शेतालगत ही महिला एकटीच राहते. शेजारील शेतकरी कुटुंब व रस्त्याने जाणारे नागरिक या वृद्धमातेला वडापाव, शेवमुरे, पाण्याच्या बाटल्या आदी देतात. त्यातच तिची गुजराण होते. ही वृद्धा नेहमी बडबड करत असतेच; परंतु नागरिकांनाही अहिराणीसह मराठी भाषेतही चांगलेच बोलते.

ती राहते, त्या शेजारीच असलेले शेतकरी कुटुंबही या आजीला भाजी, भाकरी खायला देतात. या म्हातारीकडे वेळोवेळी लक्षही ठेवतात. रस्त्याने वागणाऱ्या वाहनधारकांनी या वृद्धेला पावसापासून संरक्षण व्हावे, म्हणून प्लास्टिकचा कागदही दिला आहे. एक शिक्षक तर या महिलेला नाश्ता, तपकीर, तंबाखूही देत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

ही महिला पाऊस पडत असताना डोक्यावर प्लास्टिकचा कागद घेत पाण्यापासून संरक्षण करते. जमिनीवर पाणी साचते, वाहते तरीही ही म्हातारी शेजारच्या घरात जात नाही. ऊन, वारा, थंडी, पावसाचा घावही सोसत आहे.

020921\02jal_2_02092021_12.jpg

वाडे चाळीसगाव रस्त्यालगत बाभळीच्या झाडाखाली काटेरी झुडपात घर करुन बसलेली ही वृद्ध महिला.

Web Title: No fear of corona, no fear of death ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.