सभापतीपदी नितीन बरडे बिनविरोध
By Admin | Updated: October 15, 2015 00:24 IST2015-10-15T00:24:35+5:302015-10-15T00:24:35+5:30
जळगाव : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी खान्देश विकास आघाडीचे उमेदवार नितीन मनोहर बरडे यांची बिनविरोध निवड झाली

सभापतीपदी नितीन बरडे बिनविरोध
गंगेच्या मातीची मूर्ती : हिंदू-मुस्लिमांचा एकोपा; शासनाचे मात्र दुर्लक्ष
अनंत बोबडे येवदा
येथील एक गाव एक दुर्गा उत्सव गेल्या ३६ वर्षापासून नागरिक उत्साहात एकत्रित येऊन साजरा करतात. येथील गावकऱ्यांनी एकाच गावात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्गा उत्सव साजरा करण्यापेक्षा संपूर्ण गावाने तो एकत्र येऊन दुर्गा उत्सव साजरा केल्यास गावातील एकता आणि अखंडता अबाधित राहून गावातील एकतेची शक्ती कायम ठेवण्याची परंपरा या गावाने जोपासली आहे.
येथील दुर्गा उत्सवातील कार्यक्रम सुध्दा वाखान्याजोगा असतो. गेल्या ३५ वर्षापासून कोलकत्ता येथील मुर्तिकार साधन आचार्य या मंडळाला गंगेची माती आणून सुंदर देखनी मूर्ती तयार करतात. प्रदूषण रोखण्यासाठी मंडळाने मातीची मूर्ती तयार करुन प्रदुषणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने प्रदूषण रोखण्यासाठी लोकांना प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती तयार करण्याची बंदी जरी घातली असली तरी सुध्दा काही गावातील नागरिक प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीला अधिक पसंती देतात. या मंडळाने राष्ट्रीय एकोपा राखण्यासाठी रक्तदान, वृक्षारोपण, रोगनिदान शिबीरासारखे कार्यक्रम घेतले आहे. यंदा कुंजबिहारी महाराज यांच्या भागवत प्रवचनाचा कार्यक्रम सुरु आहे. या मंडळात सायंकाळची आरती परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेते. गावाने घालून दिलेल्या परंपरेमुळे सभामंडपात होणारी आरती एक सूर आणि एका तालात ऐकायला मिळते. या आरतीला दररोज हजारो नागरिक उपस्थित राहतात. यावर्षी दुर्गामातेचे मंदिर व रोषणाई लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दुर्गादेवी स्थापनेपूर्वी गावामधून दुर्गामातेची मिरवणूक काढून रस्त्यामध्ये पंचभाई पुऱ्यामध्ये रमजान शहावली दर्ग्यावर मंडळाचे पदाधिकारी दर्ग्यावर चादर चढवून मिरवणूक पुढे काढतात. त्यामुळे या गावामध्ये हिंदू-मुस्लिमांचा एकोपा पाहायला मिळतो. दुर्गा विसर्जनाच्या वेळेस मशीदजवळ मंडळांच्या अध्यक्षाचे मुस्लीम समुदायाच्या वतीने शाल व श्रीफळ देवून स्वागत केले जाते. यावर्षी सुध्दा नऊ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सुभाषराव कदम व मिनाक्षी कदम, श्याम ठाकरे व अर्चना ठाकरे या दाम्पत्यांना दुर्गा पुजेचा मान मिळाला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष बंडू झटाले आदी परिश्रम घेत आहेत.