अभाविपतर्फे तीन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:46+5:302021-09-23T04:19:46+5:30
जळगाव - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट फॉर डेव्हलपमेंटतर्फे गणेश घाट मेहरूण तलाव येथे निर्माल्य संकलन व ५०८ ...

अभाविपतर्फे तीन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन
जळगाव - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट फॉर डेव्हलपमेंटतर्फे गणेश घाट मेहरूण तलाव येथे निर्माल्य संकलन व ५०८ गणपती संकलन व विसर्जन करण्यात आले. यावेळी चार तास निर्माल्य संकलन करण्यात आले. त्यात तीन ट्रॅक्टर ट्रॉली शहरात व गणेश घाट या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले. या वेळी महानगर मंत्री रितेश महाजन, नगर मंत्री आकाश पाटील, मयूर माळी, नगर सहमंत्री चैतन्य बोरसे, महानगर संयोजक अभिषेक कोपुल, नगर प्रमुख मनीष चव्हाण, सागर कोळी, आदेश पाटील, संकेत वरुळकर उपस्थित होते.
००००००००००००
एकपात्री नाट्यछटा स्पर्धेत कन्याशाळेचे यश
जळगाव - ए.टी. झांबरे विद्यालय व गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकपात्री नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दुसऱ्या गटातून प. न. लुंकड कन्याशाळेची शर्वा राजेंद्र जोशी हिने प्रथम क्रमांक तर कुंजल दीपक दलाल हिने द्वितीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, सचिव अभिजित देशपांडे, विश्वस्त प्रेमचंद ओसवाल, मुख्याध्यापिका स्वाती नेवे, रागिणी पुराणिक यांनी कौतुक केले.