शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेहरुण तलावात बुडून नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:55 IST

जळगाव : मेहरुण तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या गौतम उर्फ कुणाल कैलास चव्हाण (१४, रा. सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी) या ...

जळगाव : मेहरुण तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या गौतम उर्फ कुणाल कैलास चव्हाण (१४, रा. सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी) या नववीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. दरम्यान, या घटनेने मेहरुण तलावावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हा गुरुवारी सकाळी सिंधी कॉलनीत काकूला बोलावण्यासाठी गेला. याठिकाणी काकूला घरी बोलावण्याचा निरोप देवून गौतम घरी परतला. यानंतर ११ वाजेच्या सुमारास दोन ते तीन मित्रांसोबत मेहरुण तलावावर पोहण्यासाठी गेला. तलावाच्या सांडव्याजवळ पाण्यात उतरला असता, तो तेथेच बुडाला. पाण्यात गटागंळ्या खायला लागल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली, मात्र जवळपास कोणीच नव्हते. त्यातील एकाने तातडीने घटना कुटुंबियांना कळविली. कुटुंबिय तसेच गल्लीतील तरुणांनी घटनास्थळ गाठले. गौतमला पाण्याबाहेर काढले व तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारागौतम याचा परिवार मुळ भामपुरे ता. शिरपुर येथील असून वडील कैलास प्रल्हाद चव्हाण हे कामानिमित्ताने सात वर्षांपूर्वी शहरातील मेहरुण परिसरातील सिध्दार्थ नगरात स्थायिक झाले आहेत. पत्नी सरलाबाई व अभय, गौतम, राज असे तीन मुले त्यांना होती. तिघे मुले मेहरुण परिसरातील जयदुर्गा माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. अभय दहावीला, राज पाचवीला शिकतो, तर गौतम नववीला शिकत होता. वडील बांधकाम मजूर असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. गौतमच्या मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का बसला असून आई, वडील व भावंडांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव