शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

खोटेनगरात नववीतील मुलाची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 21:17 IST

वडील होते घरात झोपलेले ः आत्महत्येचे कारण अस्पष्ट

जळगाव- घरात वडील झोपलेले असतांना मागच्या खोलीत नववीचा विद्यार्थी हर्षल विनोद पाटील (सुर्यवंशी) वय 13 रा. मानवसेवा शाळेजवळ खोटेनगर याने साडीच्यासहाय्याने गळफास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नेमके आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरातील दोन खोल्यांपैकी एका खोलीत मंगळवारी हर्षलचे वडील विनोद हिलाल सुर्यवंशी झोपले होते. तर हर्षलची आई साधना हे घराबाहेर गेलेल्या होत्या. यादरम्यान घराच्या मागच्या खोलीत हर्षलने साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. बाहेर गेलेल्या साधना घरी आल्यानंतर त्यांना हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला व त्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कदीर तडवी, पोलीस हवालदार साहेबराव पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अनिल तायडे यांनी घटनास्थळ गाठले. तसेच पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी हर्षलचे वडील विनोद सुर्यवंशी यांचा आक्रोश बघून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल तायडे हे करीत आहेत.आत्महत्येचे कारण अस्पष्टनातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील विनोद सुर्यवंशी हे तीन ते चार वर्षापूर्वी जळगावातील खोटेनगरात स्थायीक झाले आहेत. ते फायनान्समध्ये नोकरीला होते. मात्र लॉकडाऊनमुळे घरीच असून मिळेल ते काम करुन ते उदरनिर्वाह भागवित आहेत. हर्षल व विनय अशी दोन मुले त्यापैकी हर्षल हा मोठा होता. तो घराजवळ असलेल्या मानवसेवा शाळेत शिक्षण घेत होतो. आठवी पास होवून तो नववीत गेला होता. कुठलेही कारण नसतांना हर्षलचे टोकाचा निर्णय का घेतला हा प्रश्‍न कुटुंबियांसह अनेकांना पडला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर हर्षलचा मृतदेह मूळ गावी मोराणे येथे हलविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव