नऊ जुगाऱ्यांसह सव्वा लाखाची रोकड पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:00+5:302021-02-05T05:56:00+5:30
अपघात प्रकरणी गुन्हा दाखल जळगाव : बांभोरी पुलाजवळ चारचाकीने रिक्षाला धडक दिल्याने गोकुळ सुरेश सोनवणे हे जखमी झाल्याची घटना ...

नऊ जुगाऱ्यांसह सव्वा लाखाची रोकड पकडली
अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : बांभोरी पुलाजवळ चारचाकीने रिक्षाला धडक दिल्याने गोकुळ सुरेश सोनवणे हे जखमी झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी रिक्षा चालक गजानन प्रल्हाद साळुंखे (रा.पिंप्राळा) यांच्या फिर्यादीवरुन चारचाकी (क्र.एम.पी.०९ डब्लु सी.१३०६) चालकाविरुध्द मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तपास हरीलाल चौधरी करीत आहे.
लमांजन वाद प्रकरणात दुसऱ्या गटाविरुध्दही गुन्हा
जळगाव : तालुक्यातील लमांजन येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणात दुसऱ्या गटाविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे. योगेश प्रभाकर पाटील यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सुनील प्रभाकर पाटील, गोरख धोंडू पाटील, सुखदेव देवराम पाटील, राजेंद्र एकनाथ पाटील, प्रवीण एकनाथ पाटील (सर्व रा.लमांजन) व बबन राजू पाटील (रा.वाकडी, ता.जळगाव) यांच्याविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : दुचाकीवरुन पडल्याने प्रवीण जनार्दन सोनवणे (२६,रा.कानसवाडे, ता.जळगाव) या तरुणाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली होती. २४ रोजी हा अपघात झाला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक फौजदार संजय जाधव करीत आहेत.