निमगव्हाण दोंदवाडे रस्ता झाला चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:20+5:302021-08-24T04:20:20+5:30
सदर रस्ता अपघातास निमंत्रण देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे ...

निमगव्हाण दोंदवाडे रस्ता झाला चिखलमय
सदर रस्ता अपघातास निमंत्रण देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. वाहन चालविणे जिकिरीचे बनत चालले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
निमगव्हाण दोंदवाडे हा रस्ता चार किमी अंतराचा असून या रस्त्यावर पावसाळा सुरू होण्याआधी निमगव्हाण ग्रामपंचायतीने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये विटांचे तुकडे व माती टाकून बुजविले होते. परंतु काही अवजड वाहन रात्र॔ंदिवस चालत असल्यामुळे रस्त्यावर टाकलेल्या विटांच्या भट्टीतील जळालेला कोळशाचे तीनतेरा झालेले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून निमगव्हाण गावापासून ते तांदळवाडी शिवारापर्यंत या रस्त्यावर पूर्ण पणे खड्डेच खड्डे आहेत. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे पाई येणाऱ्या-जाणाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. सध्या परिसरात काही प्रमाणात शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. शाळेत जाताना विद्यार्थ्यी व शिक्षकांच्या चपला पूर्ण पणे चिखलाच्या भरलेल्या असतात. अशाच अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील दोन वर्षांपूर्वी या संदर्भात वृत्त आले होते. यामध्ये निमगव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भाटिया यांनी तक्रार दिली होती. परंतु या नंतर कोणीही बोलायला तयार नाही. रस्त्यावर चिखल झाल्यामुळे चिखलातून वाट काढत नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागत आहे. हे कितपत योग्य आहे. यासाठी परीसरातील पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्तीची मागणी करावी. जेणेकरून नागरिकांना कसरत करावी लागणार नाही, अशी मागणी होत आहे.
----
प्रतिक्रिया:-
गेल्या चार पाच वर्षांपासून निमगव्हाण ते दोंदवाडे रस्ता पूर्णपणे खराब झाला असून नवीन रस्ता बनवण्याची मागणी परिसरातून होत आहे. निमगव्हाण येथे रस्त्याला लागून घरांचे नवीन बांधकाम झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी निघण्यास जागा नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावरच साचते. रस्ता खोल व साइडपट्ट्या उंच झाल्या आहेत. विद्यार्थ्यी व नागरिकांना ये-जा शक्य नसल्यामुळे रस्ता चिखलातच अडकला की काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
- उपसरपंच श्री देवानंद पाटील
ग्रामपंचायत निमगव्हाण