निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार भास्कर कुलकर्णी यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 15:35 IST2020-08-30T15:34:21+5:302020-08-30T15:35:11+5:30
सहाय्यक फौजदार भास्कर पांडुरंग कुलकर्णी यांना त्यांच्या ३८ वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचे पोलीस महासंचालक पदक बहाल करण्यात आले.

निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार भास्कर कुलकर्णी यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मान
निंभोरा बुद्रूक, ता.रावेर : येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार भास्कर पांडुरंग कुलकर्णी यांना त्यांच्या ३८ वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचे पोलीस महासंचालक पदक बहाल करण्यात आले. उल्लेखनिय कार्याबद्दल सेवेत त्यांनी १९० बक्षिसे मिळविली आहेत.
याचा आढावा घेऊन त्यांना जळगाव येथे एका कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले.
या सन्मानाने निंभोरा पोलिस ठाण्याचे नाव उंचावले असल्याचे मत ए.पी.आय महेश जानकर यांनी शुभेच्छा देताना मांडले. सर्व निंभोरा पोलीस स्टाफसह होमगार्डसनी या सन्मानाबद्दल सहाय्यक फौजदार भास्कर कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.