शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
5
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
6
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
9
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
10
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
11
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
12
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
13
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
14
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
15
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
16
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
17
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
18
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
19
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
20
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
Daily Top 2Weekly Top 5

वार्तापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

शिक्षण विभागाकडून दरवर्षी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी आरटीईतंर्गत इंग्रजी शाळांमध्‍ये प्रवेश घेतात. पण, दुसरीकडे ...

शिक्षण विभागाकडून दरवर्षी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी आरटीईतंर्गत इंग्रजी शाळांमध्‍ये प्रवेश घेतात. पण, दुसरीकडे शासनाकडून इंग्रजी शाळांची हक्काची प्रतिपूर्ती दिली जात नाही. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासूनच्या प्रतिपूर्तीची संस्था संचालकांना प्रतीक्षा लागून आहे. ही प्रतीक्षा कधी संपणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

अधून-मधून राज्य सरकारकडून आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी तुटपुंजे अनुदान शिक्षण विभागाला पाठविले जाते. पण, या तुटपुंजा अनुदानातून किती शाळांना प्रतिपूर्ती करावी, हा पेच सुध्दा शिक्षण विभागात निर्माण होतो. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजी शाळांकडे आहे. अशा इंग्रजी माध्‍यमाच्या शाळांमध्‍ये दरवर्षी आरटीईच्या माध्‍यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो व त्यांना दर्जेदार शिक्षण मिळते. शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नसताना सुध्दा या शाळा आपला दर्जा टिकवून ठेवतात. पण, आरटीईची प्रतिपूर्तीच दिली जात नसल्यामुळे संस्था चालकांमध्‍ये नाराजी पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील काही संस्था चालकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. काहींनी राजकीय मंडळींच्या भेटी सुरू केल्या आहेत तर काहींनी थेट शासनाला पत्र पाठवून प्रतिपूर्तीची रक्कम अदा करण्‍याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रतिपूर्ती मिळत नसल्यामुळे शाळेचा खर्च चालविणे कठीण झाले असल्याचे काही संस्था चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा तरी थकीत रक्कम पूर्ण मिळणार का? हा सवाल उपस्थित होत आहे. राज्यातील काही शाळांनी आरटीईचा परतावा मिळणार नाही, तोपर्यंत शाळांमध्‍ये प्रवेश देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. अद्याप ही स्थिती जळगाव जिल्ह्यात नाही. मात्र, संस्था चालकांकडून आंदोलनाचा इशारा देण्‍यात आला आहे. तर प्रतिपूर्तीची प्रतीक्षा संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.