ऑक्सिजन टँकसाठी आता नव्याने टेंडर प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST2021-09-10T04:23:23+5:302021-09-10T04:23:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुसऱ्या ऑक्सिजन लिक्विड टँकसाठी आता नव्याने ई-निविदा प्रक्रिया ...

ऑक्सिजन टँकसाठी आता नव्याने टेंडर प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुसऱ्या ऑक्सिजन लिक्विड टँकसाठी आता नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लक्ष्मी सर्जिकलने यातून माघार घेतल्यानंतर ९ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे.
शासकीय रुग्णालयात आधी एक लिक्विड ऑक्सिजन टँक कार्यान्वित आहे. त्यानंतर एक पीएमकेअरकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीतून आणखी एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार होता. मात्र, अतिरिक्त मनुष्यबळ व अधिकचा विजेचा वापर या बाबींमुळे हा प्रकल्प रद्द करून त्या ठिकाणी अतिरिक्त २० केएलच्या ऑक्सिजन लिक्विड टँकबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्रक्रिया पूर्ण होऊन लक्ष्मी सर्जिकलला पुरवठा आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी वैयक्तिक कारण देत तसे पत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिले होते. त्यानंतर ९ सप्टेंबरपासून ही ई-निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यात आली आहे. १६ सप्टेंबर ही अंतिम मुदत असून, त्या दिवशी किती निविदाधारक आले, त्यानुसार पुढील प्रक्रिया ठरणार आहे.