नवीन सुलभ शौचालय चहार्डी येथे कुलूपबंद अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:18+5:302021-06-02T04:14:18+5:30

तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने नंबर २चे असलेले चहार्डी हे गाव असून, गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढते आहे. त्याकडे लक्ष दिले ...

New accessible toilet locked at Chahardi | नवीन सुलभ शौचालय चहार्डी येथे कुलूपबंद अवस्थेत

नवीन सुलभ शौचालय चहार्डी येथे कुलूपबंद अवस्थेत

तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने नंबर २चे असलेले चहार्डी हे गाव असून, गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढते आहे. त्याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच गावात ठिकठिकाणी सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. श्री शिवाजी सोसायटीच्या बाजूला हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. तसेच कचरा पडला आहे. स्मार्ट ग्रामचा तालुकास्तरीय पुरस्कार या गावाला मिळालेला आहे. यापूर्वी खूप मोठमोठे पुरस्कार या गावाला मिळाले आहेत. सध्या ग्रामविकास अधिकारी रजेवर आहेत. चहार्डी या गावाला गेल्या काही वर्षांपूर्वी अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविलेले आहे. मात्र, तरीही ही स्थिती निर्माण झाली आहे.

सहा महिन्यांपूर्वी जवळपास एक कोटी रुपये खर्च करून विविध विकासकामे करण्यात आली. त्यातच तीन ते चार ठिकाणी प्रत्येकी तीन लाख रुपये खर्च करून सुलभ शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यांना अजूनही कुलूपबंद ठेवले आहेत. मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करू, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, अजूनही ही शौचालये कुलूपबंद असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

===Photopath===

010621\01jal_24_01062021_12.jpg

===Caption===

नवीन सुलभ शौचालय चहार्डी येथे कुलूप बंद अवस्थेत

Web Title: New accessible toilet locked at Chahardi