आतापर्यंत एवढे बोगस सरकार पाहिले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:43+5:302021-09-05T04:21:43+5:30

रावेर : कोरोनाच्या लॉकडाऊनपासून मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरी चढले नाहीत. हजारो फायली साचून पडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात व कोकणातच नव्हे, ...

Never seen such a bogus government! | आतापर्यंत एवढे बोगस सरकार पाहिले नाही!

आतापर्यंत एवढे बोगस सरकार पाहिले नाही!

रावेर : कोरोनाच्या लॉकडाऊनपासून मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरी चढले नाहीत. हजारो फायली साचून पडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात व कोकणातच नव्हे, तर चाळीसगावला जनावरे दगावली, माणसं दगावली. दुष्काळ येवो की कोरोना येवो, यांना कुणाशी देणं-घेणं नाही, तर काही करता आले नाही तर केंद्राच्या नावाने खडे फोडतात. यांच्यासारखे आजपर्यंत एवढे बोगस सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आले नसल्याची खरमरीत टीका माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली.

श्रीक्षेत्र ओंकारेश्वर तामसवाडी येथील सभागृहात आयोजित रावेर तालुका भाजप समर्थ बुथ अभियानात ते बोलत होते. प्रारंभी रावेर विधानसभा क्षेत्र प्रभारी अजय भोळे यांनी बुथ प्रमुख, शक्तीप्रमुख यांचा आढावा घेतला.

दरम्यान, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत महाजन यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी केली. यावेळी माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, जि.प. अध्यक्ष रंजना पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, बुथ प्रमुखांमार्फत लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याची गरज असून, जिप व पंस निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते निवडून येण्यासाठी आजपासून सुरुवात करायची आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे म्हणाले की, भाजपचा सतत संघटनेला कार्यक्रम देऊन सतत जनतेत राहण्यासाठी प्रयत्न आहे.

यापुढे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले,

सामाजिक कार्याची जाणीव ठेवून सोयीसुविधा उपलब्ध करून एकाच दिवशी साडेतीन हजार लोकांना विक्रमी लसीकरण केल्याने कॅबिनेट मंत्र्यांनी भाजपचा लसीकरण मेळावा होता काय? म्हणून डॉक्टरांना फोन केल्याची खंत व्यक्त केली. जामनेर तालुक्यात सर्वत्र भाजप असल्याने लसीकरण हायजॅक केल्याचा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कन्नड घाटात जयंत पाटील आले व पाहणी करून तत्काळ मदत देऊ असे आश्वासन देत आहेत. मात्र, आमचा आमदार मंगेश चव्हाण ६० हजार रुपयांत एक घर निर्माण करून देत आहे. अन्नधान्य दिले. आमदार देतोय. सरकार मात्र सुस्त आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी व्यासपीठावर भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, रावेर विधानसभा प्रभारी अजय भोळे, अनिल पानपाटील, माजी जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिप सदस्य नंदा पाटील, पंस सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, कृउबा सभापती गोपाळ नेमाडे, माजी सभापती श्रीकांत महाजन, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, पंस सदस्य पी. के. महाजन, जितू पाटील, जुम्मा तडवी, अनिता चौधरी, योगिता वानखेडे, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, माजी पंस सदस्य महेश पाटील, विकास अवसरमल उपस्थित होते. सूत्रसंचालन वासुदेव नरवाडे यांनी केले. आभार महेश चौधरी यांनी मानले.

Web Title: Never seen such a bogus government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.