नेरजवळ २५ लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: May 20, 2014 01:02 IST2014-05-20T01:02:44+5:302014-05-20T01:02:44+5:30

धुळे : अहमदाबाद येथून हैदराबादला जाणारा २५ लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी नेर गावाजवळ ट्रकसह जप्त केला

Ner seized gutka worth 25 lakh | नेरजवळ २५ लाखांचा गुटखा जप्त

नेरजवळ २५ लाखांचा गुटखा जप्त

 धुळे : अहमदाबाद येथून हैदराबादला जाणारा २५ लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी नेर गावाजवळ ट्रकसह जप्त केला. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकसह सुमारे ३२ लाखांचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांच्या पथकाने नेर गावाजवळ सापळा रचला. सुरतकडून येणार्‍या जीजे १ / बीव्ही १३१५ क्रमांकाच्या संशयित ट्रकची पथकाने तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. तो ट्रक अधीक्षक कार्यालयात आणण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे एस.के.कांबळे, किशोर साळुंखे यांची मदत घेण्यात आली. आठ लाखांचा ट्रक व २० लाख ८८ हजारांचे गुटखा जप्त करण्यात आला. मोहम्मद फईम मोहम्मद शफिक (रा. चमरूपूर जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याला अटक केलीे आहे. ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Ner seized gutka worth 25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.