शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली पुतण्याच्या मृत्यू, बातमी ऐकून काकूचेही हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 21:13 IST

काकू व पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शामकांत सराफ

पाचोरा(जि. जळगाव) : धावत्या रेल्वेखाली पुतण्याचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने काकूचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर भागात बुधवारी रात्री घडली. काकू व पुतण्याची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. 

हनुमान नगर भागातील दादाभाऊ मोरे हे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी येथे परिवारासह गेले होते. ते घरी आल्यावर त्यांचा मुलगा किरण दादाभाऊ सोनार (मोरे) (२७)  हा तारखेडा रोडकडे रेल्वे मार्ग ओलांडून जात होता. त्याचवेळी रेल्वेचा धक्का लागून तो गाडीखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वेचे लोको पायलट जे.एच. देवरे यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन उपप्रबंधकांना या घटनेची माहिती दिली. 

किरणच्या अचानक मृत्यूची घटना कळताच त्याच्या काकू उषाबाई मन्नू सोनार (४०) यांना जोरदार धक्का बसला. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी  घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. यानंतर काकू व पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हनुमान नगर भागात एकच हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे अपघाताची पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात