शेजारच्याचा त्रास, त्रस्त महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:06+5:302021-06-04T04:14:06+5:30
या महिलेचे नाव प्रतिभा प्रेमसिंग परदेशी (२५, डांभुर्णी, ता. पाचोरा) असे असून या महिलेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले ...

शेजारच्याचा त्रास, त्रस्त महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव
या महिलेचे नाव प्रतिभा प्रेमसिंग परदेशी (२५, डांभुर्णी, ता. पाचोरा) असे असून या महिलेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, डांभुर्णी येथे त्या राहत असलेल्या घराशेजारील कुटुंबीय वापराच्या रस्त्यावरून दररोज या महिलेस शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण करतात. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात दोनवेळा तक्रार देऊनही कठोर कारवाई न करता केवळ समज देऊन सोडून दिले. मात्र हे कुटुंब वारंवार त्रास देतच आहे. या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रतिमा परदेशी यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
ही महिला प्रत्यक्ष समोर चर्चेला येत नसून महिलाविषयी ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. महिला व्यक्तिगत मानसिक त्रासाने त्रस्त असल्याचे ग्रामस्थांनीच सांगितले. या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यावरदेखील येण्यास तयार नाही. तथापि ही महिला चर्चेला समोर आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- नीता कायटे, सहायक पोलीस निरीक्षक