महिलेची चित्रफित काढून बदनामी

By Admin | Updated: January 6, 2017 22:24 IST2017-01-06T22:24:12+5:302017-01-06T22:24:12+5:30

महिलेची चित्रफित काढून ती दाखवत, त्या महिलेची बदनामी करून, विनयभंग करणारा आरोपी बंटी

Neglect of a woman's picture | महिलेची चित्रफित काढून बदनामी

महिलेची चित्रफित काढून बदनामी

ऑनलाइन लोकमत
पारोळा,जि.जळगाव, दि. 6 - महिलेची चित्रफित काढून ती दाखवत, त्या महिलेची बदनामी करून, विनयभंग करणारा आरोपी बंटी उर्फ मनोज सीताराम कोळी (मंगरूळ,ता.पारोळा) याच्याविरोधात पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मंगरूळ येथील मनोज कोळी हा पिडीत महिला जेव्हा स्रान करण्यासाठी बाथरूममध्ये जात होती, तेव्हा तो तिच्यावर लक्ष ठेवूत होता. ती स्रान करत असतांना, कपडे बदलवित असतांना मोबाईलद्वारे त्याची चित्रफित तयार केली. ही चित्रफीत गल्लीतल्या लोकांना दाखविली. ही घटना २८ जुलै १६ ते ३० आॅक्टोबर २०१६ दरम्यान घडली.त्याचा गुन्हा आज दाखल करण्यात आला.

Web Title: Neglect of a woman's picture