हा तर राज्य शासनाचा नाकर्तेपणा : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:46+5:302021-09-16T04:22:46+5:30
जामनेर : राज्यातील महाविकास आघाडी शासनास ओबीसी समाजाला आरक्षणापासून जाणूनबुजून बाजूला करावयाचे असल्याने, न्यायालयास इम्पिरिकल डेटा दिला नाही. त्यांना ...

हा तर राज्य शासनाचा नाकर्तेपणा : गिरीश महाजन
जामनेर : राज्यातील महाविकास आघाडी शासनास ओबीसी समाजाला आरक्षणापासून जाणूनबुजून बाजूला करावयाचे असल्याने, न्यायालयास इम्पिरिकल डेटा दिला नाही. त्यांना नेहमीच स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्याची सवय झाली आहे. आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, असे माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तालुका भाजपकडून बुधवारी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांना ओबीसी आरक्षणाबाबत निवेदन देण्यात आले. जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, चंद्रकांत बाविस्कर, प्रा.शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. धनगर समाज व मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणाची मागणी जावेद मुल्लाजी यांनी केली. यावेळी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, तुकाराम निकम, सभापती संजय देशमुख, जलाल तडवी, राजेश पाटील, दीपक तायडे, राजधर पांढरे, नवल पाटील, चंद्रशेखर काळे आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो