एरंडोल-धरणगाव शेतकी संघ अध्यक्षपदी नीळकंठ पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 23:11 IST2020-10-29T23:10:48+5:302020-10-29T23:11:50+5:30
एरंडोल-धरणगाव शेतकी संघाच्या अध्यक्षपदी नीळकंठ पाटील यांची निवड झाली.

एरंडोल-धरणगाव शेतकी संघ अध्यक्षपदी नीळकंठ पाटील
एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल-धरणगाव तालुका शेतकी संघाच्या संचालक मंडळाची बैठक होऊन अध्यक्षपदी नीळकंठ शंकर पाटील व उपाध्यक्षपदी संजय माणिक जाधव या दोघांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री सतिष पाटील, आमदार चिमणराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस डी.जी.पाटील, संजय पवार, सुभाष पाटील, पी.सी.पाटील, गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनात झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक के.पी.पाटील व महाले होते. त्यांना संघाचे व्यवस्थापक अरुण पाटील यांनी सहकार्य केले. या बैठकीस ज्येष्ठ संचालक गोकुळसिंग पाटील, रमेश अत्तरदे, विजय महाजन, प्रभाकर ठाकूर, सुदाम पाटील, भगवान बापूजी, राजेंद्र पाटील, रमेश पाटील, दीपक वाणी, शरद पाटील, संचालिका विजया भांडारकर, कल्पना देवकर तसेच मार्केटचे माजी सभापती संभाजी चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, डॉ.सतीश देवकर, अशोक भांडारकर आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक के.पी.पाटील यांनी काम पाहिले. शेतकी संघाचे व्यवस्थापक अरुण पाटील, देवीदास पाटील, राजेंद्र पाटील, सागर पाटील यांनी सहकार्य केले.