विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढवण्यासाठी विज्ञान केंद्रांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:34+5:302021-07-29T04:16:34+5:30
भुसावळ येथे रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनअंतर्गत उषा नॅशनल सायन्स रिसर्च सेंटरच्या माध्यमातून डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ ...

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढवण्यासाठी विज्ञान केंद्रांची गरज
भुसावळ येथे रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनअंतर्गत उषा नॅशनल सायन्स रिसर्च सेंटरच्या माध्यमातून डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी उषाबाई शंकर पाटील होत्या. कार्यक्रमाला मुंबई येथील नेहरू प्लॅनेटोरियम रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ जेजे रावल, इस्रोचे एक्स सायंटिस्ट भरत चानीयारा, रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी, भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, गणराया कन्स्ट्रक्शनचे विजय खाचणे, अचिव्हर्स अकॅडमीचे संचालक संदीपकुमार चौधरी, उषा फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे उपस्थित होते.
यावेळी ऑनलाइन व ऑफलाइन एकत्रित कार्यक्रमावेळी विज्ञान केंद्राचे उद्घाटन डॉक्टर अरविंद रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सेंटरचे महाराष्ट्र डायरेक्टर सुनील वानखेडे यांनी केले.
या कार्यक्रमास अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, ए.टी. महामंडळाचे निवृत्त ए.ई.ओ. मिठाराम सरोदे, रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष संजू भटकर, ग.स. सोसायटीचे माजी तज्ज्ञ संचालक योगेश इंगळे, नूतन पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष समाधान जाधव, धीरज चौधरी, बापूदादा चौधरी, शैलेंद्र भंगाळे, भूषण झोपे, मीनाक्षी जावळे, वंदना भिरुड, निलाक्षी महाजन उपस्थित होते. कार्यक्रमात यज्ञेश भिरुड, सानिका चौधरी, अमृता इंगळे, प्रेरणा सोनवणे, मयंक चौधरी, अथर्व इंगळे, पौरस वानखेडे, आदित्य महाजन, रोहन सोनवणे, पुष्कर सपकाळे, पार्थ वानखेडे, वेदांशू फेगडे यांनी प्रात्यक्षिके सादर केली.