महापौरांच्या प्रभागात राष्ट्रवादीचे कार्यालय ‘सील’!

By Admin | Updated: September 29, 2015 23:25 IST2015-09-29T23:25:46+5:302015-09-29T23:25:46+5:30

धुळे : महापालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. हे कार्यालय महापौरांच्याच प्रभागात आहे.

NCP's office 'seal' in the mayor's office! | महापौरांच्या प्रभागात राष्ट्रवादीचे कार्यालय ‘सील’!

महापौरांच्या प्रभागात राष्ट्रवादीचे कार्यालय ‘सील’!

धुळे : महापालिकेच्या वसुली विभागाने सध्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उचलला आह़े या मोहिमेंतर्गत मंगळवारी नाटेश्वर कॉलनी परिसरात तीन गाळे सील करण्यात आल़े त्यातील एका गाळ्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय असून महापौरांच्या प्रभागात ही दणकेबाज कारवाई करण्यात आली़ या कारवाईमुळे महापौरांसह राष्ट्रवादीला घरचा अहेर मिळाला आह़ेसीलच राहतील अशी स्पष्ट भूमिका वसुली विभागाने घेतली आह़े सीलकरण्यात आलेले कार्यालय पक्षाचे नसून केवळ पक्षाच्या एका कार्यकत्र्याचे असल्याचेही पक्षाच्या पदाधिका:यांचे म्हणणे आह़ेलोकमतशी बोलताना स्पष्ट केले आह़े

शहरात थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े त्यामुळे एकीकडे थकबाकीदारांवर कारवाई करण्याबरोबरच नियमित कर वसुलीसाठी मनपाची जोरदार कारवाई सुरू आह़े शहराच्या चारही भागात गेल्या आठवडाभरापासून विविध व्यापारी गाळे, मोबाइल टॉवर यासह अन्य मालमत्ताधारकांच्या मालमत्ता सील करून त्यांच्याकडून कर वसुली करण्यात येत आह़े या मोहिमेंतर्गत मंगळवारी मनपा वसुली विभागाच्या पथकाने प्रभाग 26 मधील नाटेश्वर कॉलनीतील सरला अनिल छाजेड यांच्या मालकीचे तीन गाळे 96 हजार 700 रुपयांच्या थकबाकीमुळे सील केल़े त्यातील एका गाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस या मनपातील सत्ताधारी पक्षाचे कार्यालय आह़े

भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या या कार्यालयासह अन्य गाळ्यांच्या कराची थकबाकी भरण्याचे काम संबंधित मालमत्ताधारकाचे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच कार्यालय सील होणे, हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आह़े महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी नवीन आयुक्त आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येक काम करून घेण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत आह़े सदर कार्यालय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पिंटू यादव यांचे असून ते निवडणुकीवेळी भाडेतत्त्वावर घेण्यात आले होत़े मात्र गाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आह़े

मनपा प्रशासनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने नमती भूमिका घेतल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आह़े तर दुसरीकडे संबंधित मालमत्ताधारक जोर्पयत थकबाकी भरणार नाही, तोर्पयत सर्व गाळे

---------------------

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती घेतली आह़े कोणत्याही पक्षाचे कार्यालय असले तरी कर भरला नसेल तर कारवाई व्हायलाच हवी़ आपण धुळे शहराचे नागरिक आहोत, त्यामुळे कर भरणे आपले कर्तव्य आह़े पण जर कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असेल तर कोणताही राजकीय पक्ष असो वा संघटना, सर्वाना समान न्याय मिळायला हवा़

-जयश्री अहिरराव, महापौर, मनपा, धुळे

----------------------------

थकबाकी भरेर्पयत टाळेच राहणार ़़

मनपा वसुली विभागाने सील केलेल्या गाळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असले तरी ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पिंटू यादव यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले आह़े त्यामुळे जोर्पयत संबंधित मालमत्ताधारक थकबाकीची रक्कम भरत नाही, तोर्पयत गाळे सीलच राहतील, असे वसुली विभागाने

Web Title: NCP's office 'seal' in the mayor's office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.