राष्ट्रवादीतर्फे रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जळगावात चप्पल मार

By Admin | Updated: May 12, 2017 13:41 IST2017-05-12T13:41:15+5:302017-05-12T13:41:15+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला चप्पल मार आंदोलन करण्यात आले.

NCP's image of Ravsaheb Danwei in Jalgaon slippers | राष्ट्रवादीतर्फे रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जळगावात चप्पल मार

राष्ट्रवादीतर्फे रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जळगावात चप्पल मार

>जळगाव, दि.12- तूर खरेदीवरून शेतक:यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शुकक्रवारी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला चप्पल मार आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, आय.टी.सेल जिल्हाध्यक्ष संदीप पवार, रोहन सोनवणे, सोपान पाटील, ललित बागुल, किशोर पाटील, सागर कुमावत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिका:यांनी रावसाहेब दानवे जळगाव जिल्ह्यात येतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला.

Web Title: NCP's image of Ravsaheb Danwei in Jalgaon slippers