आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. ७ - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरु करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या तिस-या टप्प्याची सांगता २१ रोजी चाळीसगावी होणार आहे. याबाबत कार्यकर्ते व पदाधिका-यांना मार्गदर्शनासोबतच रणनिती ठरविण्यासाठी मंगळवारी दुपारी माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांच्या उपस्थित प्रमुख पदाधिका-यांची बैठक झाली. अर्थसंकल्प व फडणवीस सरकारच्या धोरणांवर बैठकीत टीका करण्यात आली.हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजनाचा आराखडा पक्षाच्या वतीने देण्यात आला असून त्याची सुरुवात १५ फेब्रुवारी पासून नगर जिल्ह्यातून होणार आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून यात्रा जळगाव जिल्ह्यात येणार असून त्यात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी अमळनेर,पारोळा,चोपडा येथे सभा होणार आहे. २० रोजी बोदवड,मुक्ताईनगर,रावेर,जामनेर या मार्गे येणार असून २१ फेब्रुवारी रोजी धरणगाव,पाचोरा येथून चाळीसगाव येथे हल्लाबोल आंदोलनाचा समारोप केला जाणार आहे.राजीव देशमुख यांच्यासह तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील,जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे,नगरसेवक रामचंद्र जाधव यांची भाषणे झाली. गटनिहाय बैठका घेऊन आंदोलनाविषयी जनजागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या. याप्रसंगी पक्षाचे जि.प तसेच पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे संचालक, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
चाळीसगावला होणार राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा २१ रोजी समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:50 IST
सरकारच्या धोरणांवर टीका
चाळीसगावला होणार राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा २१ रोजी समारोप
ठळक मुद्देआंदोलनाच्या तिस-या टप्प्याची सांगता