इंधन दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST2021-05-14T04:16:44+5:302021-05-14T04:16:44+5:30

जळगाव : इंधन दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून घरगुती ...

NCP's agitation against fuel price hike | इंधन दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

इंधन दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव : इंधन दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे या इंधन दर वाढीला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने राज्यभरात आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

आकाशवाणी चौकात सकाळी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, उपाध्यक्ष मिनाक्षी चव्हाण, मंगला पाटील, शकीला तडवी, डॉ. सुषमा चौधरी या पाच जणींनी आंदोलन केले. कोविड १९ मुळे निषेध नोंदवण्यासाठी फक्त पाच कार्यकर्त्यांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार या पाचही जणींनी केंद्र सरकारचा निषेध केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनीही केंद्र सरकारने केलेल्या या दरवाढीचा निषेध केला आहे.

Web Title: NCP's agitation against fuel price hike