राष्ट्रवादी काँग्रेसचे दरेकरांविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:20 IST2021-09-16T04:20:53+5:302021-09-16T04:20:53+5:30
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात शहरात बुधवारी (दि. १५) सकाळी छत्रपती ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे दरेकरांविरोधात आंदोलन
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात शहरात बुधवारी (दि. १५) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी दरेकर यांच्या फोटोवर शाई टाकण्यात आली तसेच फोटोला जोडेदेखील मारण्यात आले.
यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष कल्पना अहिरे, मीनाक्षी चव्हाण, निरीक्षक शालिनी सोनवणे, कार्याध्यक्ष आशा येवले, सुमन बनसोडे, दीपिका भामरे, मीनाक्षी शेजवळ, पिनाज फनीफंदा, ॲड. निशा निंबाळकर, नीलाक्षी साठे उपस्थित होत्या. मंगळवारी दरेकर यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दरेकर यांच्या निषेधाच्या घोषणादेखील दिल्या.