राष्ट्रवादी आज पंतप्रधानांना पाठविणार गव-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:22 IST2021-09-04T04:22:01+5:302021-09-04T04:22:01+5:30
जळगाव - जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढी विरोधात शनिवारी सकाळी ११.३० वाजता आगळे वेगळे आंदोलन ...

राष्ट्रवादी आज पंतप्रधानांना पाठविणार गव-या
जळगाव - जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढी विरोधात शनिवारी सकाळी ११.३० वाजता आगळे वेगळे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी गॅस दरवाढ केल्याने केंद्र शासनाचा निषेध म्हणून पोस्टाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गव-या पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवार सकाळी पांडे डेअरी चौकातील टपाल कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांनी केले आहे.
०००००००००००००
स्वर्ग रथाचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जगद्गुरू महर्षी वाल्मिकी बहुउद्देशीय संस्था तसेच समाजसेवक भरत सपकाळे यांच्या विद्यमाने विजय शंकर सपकाळे यांच्या स्मरणार्थ शिवनगर-खेडी येथे स्वर्ग रथाचा लोकार्पण सोहळा महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पार पडला. यावेळी खेडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.