शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मोदींचे हस्तक आहात, तर मग इकडचं तिकडं करू नका!, वेदांता फॉक्सकॉनवरून एकनाथ खडसेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 18:19 IST

सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून वादाला सुरूवात झाली आहे.

सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉनवरून वादाला सुरूवात झाली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार होता. परंतु आता तो प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर टीका केली.

फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवल्याने एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. “हा प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित व्हावा, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक बाब आहे, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली असती. रोजगार उपलब्ध झाला असता,” असेही खडसे म्हणाले. मागचाही एक प्रकल्प अशाच प्रकारे हलवण्यात आल्याचा आरोपही खडसेंनी केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना भेटून हा प्रकल्प महाराष्ट्रातच व्हावा म्हणून प्रयत्न करायला हवेत, अजूनही वेळ गेलेली नाही. हा राजकीय विषय नाही, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

सुप्रियासुळेंचाही टोमणा“मी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ, तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा,” असा खोचक टोला त्यांनी उदय सामंत यांच्या प्रतिक्रियेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला. “अडीच वर्ष खुप मोठा वेळ आहे. इतके वर्ष ते का बसले होते. ते खातं शिवसेनेकडे होतं. त्यातले काही लोक शिंदेसेनेत आहेत,” असंही त्या म्हणाल्या. हा राजकारणाचा विषय नाही. राजकारण हे गंभीर असतं. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अर्थिक बाबीचा प्रश्न आहे. सर्व नेत्यांनी एकत्र यावं, राजकारण बाजूला ठेवावं, ही गुंतवणूक मेरिटवर मिळाली होती, ती मेरिटवरच मिळाली पाहिजे. हे आताच्या सरकारचं अपयश असल्याचंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेMaharashtraमहाराष्ट्रFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डील