वराडसीम येथे राष्ट्रवादीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:09 IST2020-07-23T15:09:04+5:302020-07-23T15:09:19+5:30

वराडसीम येथील आरोग्य केंद्रात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

NCP honors Corona warriors at Varadsim | वराडसीम येथे राष्ट्रवादीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

वराडसीम येथे राष्ट्रवादीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

भुसावळ : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या वतीने भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील आरोग्य केंद्रात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना योद्धा भगिनींच्या हस्ते केक कापून त्यांच्यासोबत वाढदिवस केला साजरा.
सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. ही महामारी कमी व्हावी म्हणून महाराष्ट्रात सरकार तत्परतेने काम करत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँंग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. समाजासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र व साडीचोळीसाठी भगिनींना रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले व ऋण व्यक्त केले.
गटविकास अधिकारी विलास भाटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दवंगे, डॉ.शीतल कदम, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर दोळे, युवक जिल्हा चिटणीस मंगेश पाटील, माजी सरपंच विलास पाटील, योगेश नरोटे, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

 

Web Title: NCP honors Corona warriors at Varadsim