राष्ट्रवादीकडून सेंट्रल बँक व्यवस्थापकांच्या रिकाम्या खुर्चीला हार

By Admin | Updated: April 24, 2017 15:52 IST2017-04-24T15:52:39+5:302017-04-24T15:52:39+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील व्यवस्थापक गैरहजर असल्याने ग्राहकांचे हाल होत आहे.

NCP defeats the vacant chair of Central Bank Managers | राष्ट्रवादीकडून सेंट्रल बँक व्यवस्थापकांच्या रिकाम्या खुर्चीला हार

राष्ट्रवादीकडून सेंट्रल बँक व्यवस्थापकांच्या रिकाम्या खुर्चीला हार

वरणगाव,दि.24-गेल्या दोन महिन्यांपासून वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील व्यवस्थापक गैरहजर असल्याने ग्राहकांचे हाल होत आहे. बँकेच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी शाखा व्यवस्थापकांच्या रिकाम्या खुर्चीला फुलांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
गेल्या दोन महिन्यांपासून सेंट्रल बँकेच्या वरणगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक गैरहजर आहेत. त्यामुळे कर्मचा:यांवर अंकुश नसल्याने त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे. त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ ग्राहकांना मिळत नाही. तसेच शेतकरी, पेन्शनर, व्यापारी ग्राहकांकडून विचारणा केल्यानंतर उद्धट वागणुक दिली जाते. बँकेच्या शेजारी असलेले एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या समस्यांसंदर्भात प्रभारी शाखा व्यवस्थापक पाठक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी, संतोष माळी, अमोल पाटील, गोविंद गांवडे, विनोद मराठे, दीपक मराठे, रवींद्र पाटील उपस्थित होते.

Web Title: NCP defeats the vacant chair of Central Bank Managers