भुसावळमध्येही राष्ट्रवादीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:52+5:302021-07-14T04:20:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : राजकीय षडयंत्रातून ईडी या संस्थेचा वापर करून एकनाथ खडसे व कुटुंबीयांना नाहक ...

भुसावळमध्येही राष्ट्रवादीने
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : राजकीय षडयंत्रातून ईडी या संस्थेचा वापर करून एकनाथ खडसे व कुटुंबीयांना नाहक त्रास देण्याचा निषेध म्हणून भुसावळ येथे राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेस अध्यक्ष नंदा निकम यांनी तहसीलदार दीपक ढिवरे यांना निवेदन दिले.
केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजपने खडसे यांच्या कुटुंबीयांवर कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केलेला आहे. हा प्रकार तत्काळ थांबवून त्यांचा मानसिक छळ थांबवावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा नंदा निकम, प्रकाश निकम, दिलीप जनार्दन, सीता बाविस्कर, शबाना बी, आरिफ शेख, भारती देविदास भोसले, किरण मनोज भोसले, संजय चव्हाण, सुनंदा भंगाळे, सविता चौधरी, सुनीता वकारे, आनंदा वकारे, शेख सईद बी आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.