फैजपूर उपनगराध्यक्षपदी नयना चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 19:27 IST2020-09-08T19:25:50+5:302020-09-08T19:27:59+5:30
फैजपूर उपनगराध्यक्ष पदाची मंगळवारी बिनविरोध निवड झाली.

फैजपूर उपनगराध्यक्षपदी नयना चौधरी
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यात उपनगराध्यक्षपदी नयना चंद्रशेखर चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रशीद नसीर तडवी यांनी उपनराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडीसाठी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन विशेष सभा बोलाविण्यात आली. या निवडीसाठी काँग्रेस, अपक्ष गटाच्या नगरसेविका नयना चौधरी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी या ऑनलाईन सभेप्रसंगी
व्यासपीठावर नगराध्यक्षा महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण सभागृहात उपस्थित होते.
निवडीचे कामकाज सभा लिपिक सुधीर चौधरी, बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे, सहाय्यक कार्यालय निरीक्षक संतोष वाणी यांनी पाहिले.