यावल नगराध्यक्षपदासाठी नौशाद तडवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 15:10 IST2020-07-06T15:08:53+5:302020-07-06T15:10:05+5:30
यावल नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी नौशाद मुबारक तडवी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावल नगराध्यक्षपदासाठी नौशाद तडवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सुधीर चौधरी
चुंचाळे, जि.जळगाव : यावल नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी नौशाद मुबारक तडवी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्या अनुसूचित जमाती महिला या राखीव जागेतून निवडून आलेल्या एकमेव सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. अध्यक्षपदासाठी १४ रोजी निवड जाहीर होणार आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी या जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे.
त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंतराव पाटील व अनुमोदक म्हणून प्रभारी नगराध्यक्ष व नगरसेवक राकेश कोलते यांच्या स्वाक्षºया आहेत.
यायाप्रसंगी नगरसेवक अभिमन्यू चौधरी, प्रा.मुकेश येवले, रुखमाबाई महाजन, देवयानी महाजन, कल्पना वाणी, पौर्णिमा फालक, रेखा चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी बबन तडवी व शिवानंद कानडे तसेच रमाकांत मोरे यांनी स्वीकारला. आता १४ जुलै रोजी नगराध्यक्षपदाची केवळ औपचारिक घोषणा होणार आहे. यामुळे अतुल पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.