खान्देशातील कलावंतांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:18 IST2019-11-05T21:18:50+5:302019-11-05T21:18:55+5:30
चोपडा : खान्देशातील पाच कलावंतांच्या कलाकृतींना राजस्थान येथे झालेल्या प्रदर्शनात सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ...

खान्देशातील कलावंतांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
चोपडा : खान्देशातील पाच कलावंतांच्या कलाकृतींना राजस्थान येथे झालेल्या प्रदर्शनात सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
जयपूर (राजस्थान) येथील जवाहर कला केंद येथे २ व ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कला प्रदर्शनात खान्देशातील पाच चित्रकारांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यात भागवत सपकाळे (फुपणी, ता.जळगाव) यांना उत्कुष्ट निसर्ग चित्रकार म्हणून तर मनोहर बाविस्कर (पिलखोड,ता.चाळीसगाव) उत्कृष्ट पेन्सिल रेखाटनासाठी गौरविले आहे. तसेच महेंद्र चौधरी (फुपनगरी, ता.जळगाव) यांना उत्कृष्ट रचना चित्रकार, ज्ञानेश्वर माळी (चोपडा) उत्कृष्ट निसर्ग चित्रकार तर महेश कदम (चाळीसगाव) यांना उत्कृष्ट अमूर्त चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले.